बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोपपत्रच दाखल नाही!; पालघर साधू हत्याकांडातील 28 संशयितांना जामीन मंजूर

पालघर | पालघरमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दोन साधूंसह एका चालकाची स्थानिकांनी हत्या केल्यानं संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान या घटनेचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. मात्र या हत्याकांडामधील तब्बल 28 संशयित आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. या संशयितांवर आरोपपत्रच दाखल नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

मात्र 28 पैकी 18 आरोपींवर आता तिसरे आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानं केवळ 10 जणांचीच जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 30 हजारांच्या जातमचुलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय.

मात्र या आरोपींची कायमची सुटका झाली नसून भविष्यातही जामीन झालेल्या व्यक्तींवर आरोपपत्र दाखल केली जाण्याची शक्यता आहे. सध्या सीआयडीकडे दाखल झालेल्या आरोपपत्रात 47 आरोपींचाच उल्लेख असल्याची माहिती आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या चालकाचा जमावाने केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख 5 हल्लेखोर आणि सुमारे 100 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता!!! आता चक्क व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार गॅस बुकिंग

‘पद्म पुरस्कार समिती’च्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती…

“सळसळत्या रक्ताच्या माझ्या तमाम मित्रांना..” आव्हाडांकडून युवा दिनाच्या खास शुभेच्छा

लोकांना ‘डिजिटल साक्षर’ करण्यासाठी ‘या’ कंपनीने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

दिल्लीत परिस्थिती बिकट झाली होती, मात्र… पंतप्रधानांकडून अमित शहांचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More