देश

भाषण सुरु असताना मोहन भागवतांवर साधू भडकले, पाहा नेमकं काय घडलं…

लखनऊ | सरसंघचालक मोहन भागवत भाषण करत असताना राम मंदिर कधी होणार, त्याची तारीख सांगा, असा जाब धर्मसंसदेत सहभागी झालेल्या साधूंनी त्यांना विचारला आहे. ते  उत्तर प्रदेशातील धर्मसंसदेत बोलत होते.

राम मंदिर एक ते दोन वर्षात होईल, असं मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. यानंतर आक्रमक झालेल्या साधूंनी भागवत यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केली.

राम मंदिरासाठी कायदा करण्यात यावा, यासाठी हिंदूत्ववादी संघटना गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा वगळून इतर जमीन राम जन्मभूमी न्यासाला देण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

हेल्मेट सक्तीविरोधी संतप्त आंदोलकांनी मेधा कुलकर्णींना हुसकावलं

मुख्यमंत्री फडणवीसांना आठवड्यातला आणि महिन्यातला फरकही कळेना! पाहा व्हीडिओ-

गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी

-शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस

-5 लाखांपर्यंत करमुक्ती करण्याची लोकांची मागणी पूर्ण केली- पंतप्रधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या