बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”

भोपाळ | भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले होते. हनुमान चालिसाचं सामूहिक वाचन त्याचबरोबर कोरोनासाठी यज्ञ करायला लावणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आता त्यांनी कोरोना होऊ नये म्हणून एक अजब सल्ला दिला आहे.

गोमूत्र पिल्यानं फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्र घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असं अजब वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याचं आणि गो-पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

संत नगरमधील परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे अजब वक्तव्य केलं. त्याचबरोबर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशी गाय पाळण्याचं आवाहन केलं. तसेच त्या स्वतः एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.

दरम्यान, साध्वी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी नुकतच हनुमान चालिसाचं सामूहिक वाचन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. यावर ‘कितीही हनुमान चालिसाचं वाचन कर पण तुझा जीव वाचणार नाही’, अशी धमकी दिल्याचा दावा साध्वी यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात- आमदार सातपुते

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More