बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाटला हाऊसमध्ये त्यावेळी जे काही झालं, त्यानंतर सोनिया गांधी…”

नवी दिल्ली | भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. काँग्रेसला दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा पक्ष आहे, अशी टीका करत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

बाटला हाऊसमध्ये त्यावेळी जे काही झालं, त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या होत्या. काँग्रेस हा दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस कधीच देशभक्त पक्ष होऊ शकत नाही, असंही साध्वी ठाकूर म्हणाल्या आहेत. काँग्रेसमध्ये देशभक्त नाहीत त्यामुळे ते कधीच देशभक्तीच्या गोष्टी करू शकत नाहीत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

आरएसएसमुळे काँग्रेसला पूर्ण मतमतांतर करता येत नाही. आरएसएसमुळे त्यांना दहशत पसरवता येत नाही. आरएसएसची सध्या सत्ता नाहिये पण, आरएसएस लोकांच्या मनामनात आणि घराघरात आणि जनमाणसात पोहचली आहे, असंही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यावेळी म्हणाल्या.

जगभरात बंधुभाव टिकून राहण्यासाठी आरएसएस जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच भारत आज सुरक्षित आहे. उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आरएसएसमुळेच शांती मिळाली, असंही साध्वी प्रज्ञांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची, अशी ठाकरे सरकारची अवस्था”

‘…तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार’; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वरूण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; पाहा व्हिडीओ

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More