बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सुची(एनपीआर) या मुद्द्यांवरुन आपली भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेनं लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला. पुन्हा मोदींना भेटल्यानंतर सीएए, एनआरसीला पाठिंबा दिला आहे. वाघ आहे का बेडूक…., असं म्हणत संदीप देशपांडे यांनी बोचरी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सीएए, एनआरसी, एनपीआर या मुद्यांवर सविस्तरपणे भाष्य केलं. सीएएबद्दल कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असं म्हणत त्यांनी पाठिंबा दिला. तर एनआरसी लागू झाल्यानंतर त्यात काही चुकीचं आढळलं तर त्याला विरोध करु, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेची विसंगत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसत आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करताना नवाब मलिक गप्प; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

‘इंदोरीकर महाराजांचा हा व्हीडिओ बघाच’; रूपाली ठोंबरेंचा तृप्ती देसाईंना टोला

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला

“फडणवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा”

“‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More