“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
अकोला | राष्ट्रपती पदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपती पदासाठी एक उंची असावी लागते. शरद पवार यांना उगाच चर्चेत आणलं जात आहे, असा टोमणा वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांना लगावला.
अनेक वेगवेगळ्या जांगासाठी परिक्षा घेण्यात येतात. राष्ट्रपती पदासाठी एक विशिष्ट बौद्धिक पातळी लागते. त्यामुळे शरद पवारांनी ठरवावं त्यांच्याकडे कोणती उंची आहे आणि या पदावर जायचं की नाही, असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, 17 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे पण सध्या तरी आपण यासाठी इच्छुक नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
या राष्ट्रपतीच्या निवडणूकीसाठी ममता बॅनर्जींच्या पुढाकाराने भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त उमेदवार देण्याच्या औपचारिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
थोडक्यात बातम्या
…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, वाचा आकडेवारी
काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर
“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण ‘या’ कारणामुळे मुक्काम तुरुंगातच
Comments are closed.