भोपाळ | भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली असून आपलं वक्तव्य त्यांनी मागं घेतलं आहे.
गोडसेबद्दलचं माझं मत हे वैयक्तिक होतं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणाच मन दुखावलं गेलं असल्यास माफी मागते, असं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.
भाजप त्यांच्या मताशी सहमत नाही. या मताचा भाजप तीव्र निषेध करतो. त्यांनी या मताबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली होती.
साध्वी प्रज्ञा यांचे प्रवक्ते आणि भाजपचे नेते हितेश वाजपेयी यांनी आणि माफी मागून आपलं वक्तव्य मागे घेतलं, असं नरसिंह राव यांनी सांगितलं पण ही माफी नेमकी कोणासमोर मागितली हे ते सांगू शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव
-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला
-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव
काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस
-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा
Comments are closed.