दुर्लक्षित केलेल्या पाकच्या स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

इस्लामाबादपाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. वादग्रस्त गोलंदाजीच्या शैलीत योग्य तो बदल केल्यानंतरही त्याला संघात संधी मिळाली नाही त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. 

सईद अजमल 2011 ते 2014 या काळात पाकिस्तानसाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून नावारूपास आला. या काळात तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचला होता.

सईदच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 2009 मध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपदही पटकावले होते. मात्र पाकिस्तानने त्याला योग्य सन्मान दिला नसल्याचं बोललं जातंय.