बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पाठोपाठ गोवा राज्यातील 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती दिली.

बारावीच्या परीक्षांबाबत सरकार तीन पर्यायांच्या विचाराधीन होतं एक म्हणजे परीक्षा पूर्णता रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणं आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणं  आणि दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे. मात्र अखेर तज्ज्ञांचा विचार घेऊन आणि राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने जर परीक्षा देणं पसंत केलं आणि परीक्षेत त्याला कमी गुण मिळालं तर संबंधित विद्यार्थीनंतर अंतर्गत गुणांवर दावा करू शकणार नाहीत. अंतर्गत गुणांच्या आधारावर आपल्याला उत्तीर्ण करा, अशी मागणी करू शकणार नाहीत. ती मान्य केली जाणार नाही, असं प्रमोद सावंत म्हणाले.

दरम्यान, मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला.

 

थोडक्यात बातम्या- 

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल

कडक सॅल्युट! पोलिसांनी जखमी महिलेला 4 किलोमीटर झोळीमध्ये उचलून नेत वाचवले प्राण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More