Top News चंद्रपूर

दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश

चंद्रपूर | चंद्रपूरमध्ये एका दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वासनलिकेत सेफ्टी पिन अडकली होती. सुदैवाने ही पिन योग्यरितीने बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय.

21 डिसेंबर रोजी दीड वर्षांच्या रियांशचं नाक साफ करण्यासाठी त्याच्या आजीने सेफ्टी पिन नाकात घातली. यावेळी ती सेफ्टी पिन नाकावाटे घशात जाऊन श्वासनलिकेत गेली. त्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तातडीने बाळाला चंद्रपूरच्या रूग्ण्यालयात दाखल करण्यात आलं.

चंद्रपूरातील कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डॉ. मनीष मुंदडा यांनी ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही सेफ्टी पिन बाहेर काढली. ही पिन बाळासाठी धोकादायक ठरली असती, असंही डॉक्टरांनी सांगितलंय.

दरम्यान लहान मुलांच्या कानात किंवा नाकात अशा वस्तू न घालण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या