बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते ऑनलाईन प्रदर्शित करणे याप्रकरणी 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचे धागेदोरे समोर आले आहेत. याप्रकरणी अनेकांनी समोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने देखील याप्रकरणी काही धक्कादायक खुलासे करत राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.

राज कुंद्राने एका फिल्मसाठी सागरिकाला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. मात्र, सागरिकाने ते ऑडिशन देण्यास नकार दिला यामुळे सागरिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, असा आरोप सागरिकाने केला आहे. सागरिकाने नुकतीच एका वृत्त वाहिणीला मुलाखत दिली त्यावेळी तिने हा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना सागरिका म्हणाली की, मला आता देखील खूप भिती वाटत आहे. लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि मला राज कुंद्राने काय चुकी केली? असा प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, इंडस्ट्रीमध्ये अनेकांना काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जातं आणि अशाप्रकारच्या कामांंमध्ये अडकवलं जातं. येथे नवीन येणाऱ्या कलाकारांनी चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकत नसल्याची खात्री करुन योग्य निर्णय घ्यावा, असं देखील सागरिकाने यावेळी म्हटलं आहे. तसेच राज कुंद्रावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी सागरिकाने केली आहे.

थोडक्यात बातम्या –

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

‘राजने नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरलासुद्धा…’; पॉर्नोग्राफी केसमध्ये गहनाचा धक्कादायक खुलासा!

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More