बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं निधन

लातूर | सहकारमहर्षी व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे उर्फ काकासाहेब यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. शुक्रवारी रात्री त्यांचं निधन झालं आहे.  ते 96 वर्षांचे होते. आपल्या जुन्या पिडीतील नेत्याला गमवल्यानं लातूरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीराव नाडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.  लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामं ही आजही ओळखलं जातात. मुरूड येथील जनता विद्यामंदीर संस्थेचे ते अध्यक्ष होते. मुरूड ग्रामपंचायत त्यांच्या नेतृत्वात बिनविरोध होती. त्यांनी तब्बल 38 वर्षे सरपंच म्हणून कार्यभार पाहिला होता. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदुर होती.

ग्रामविकासाच्या अनेक योजना त्यांच्या पुढाकारानं राबविल्या गेल्या. खादी उद्योगातून विणकाम, हातकाम, सुतकतई आदी उद्योग सुरू केले होते. रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुरूड सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर सहकार संस्थेचे जाळेही त्यांनी उभारलं होतं. 1980 मध्ये लातूर विधानसभा निवडणुकीत ते एस. काँग्रेसचे उमेदवार होते.

दरम्यान, सहकार, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिलं आहे. त्यांचे योगदान स्मरणीय आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना लातूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

खासदार नुसरत जहाॅं यांचा गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More