महाराणा प्रताप जयंतीवरुन वाद, दलितांची २५ घरं जाळली

सहारनपूर | उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये मिरवणुकीवरुन झालेल्या वादाचं रुपांतर दलितांची घरं पेटवण्यात झालंय. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून २० लोक जखमी झालेत.

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त बडगाव ते सिमलाना गावादरम्यान मिरवणूक काढण्यात आली. मात्र सबीरपूर गावच्या सरपंचाने गावात डीजे न वाजवण्याचं फर्मान सोडलं. त्यामुळे ठाकूर आणि दलितांच्या गटांमध्ये दगडफेक झाली. यानंतर दलितांच्या सुमारे २५ घरांना आगी लावण्यात आल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा