बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इरफान खानमुळे बाॅलिवुडचे तीन खान एकत्र

मुंबई | अभिनेता इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त असल्यामुळे इरफान त्याच्या आगामी चित्रपट ‘ब्लॅकमेल’ च्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीये. मात्र त्याला प्रमोशनसाठी मदत करायला बाॅलिवुडचे तीन खान सज्ज झाले आहेत.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिघंही इरफानच्या ‘ब्लॅकमेल’ चित्रपटाच्या स्क्रिनींगसाठी एकत्र येणार असून 6 मार्च रोजी होणाऱ्या स्पेशल स्क्रिनींगनंतर हे तीन खान ‘ब्लॅकमेल’चं प्रमोशन करणार आहेत.
दरम्यान, इरफानला उपचारासाठी विदेशात जावं लागणार आहे. त्यामुळे हे तीन खान पहिल्यांदाच एकत्र येऊन या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे, असं समजतंय.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More