पुणे | ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी पाळलेला परदेशी कुत्रा चोरीला गेला होता. पोलिसांनी आपल्या साहेबाचा कुत्रा म्हटल्यावर दिवस-रात्र एक करत शोध घेतला आणि चोरालाही बेड्या ठोकल्या आहेत.
विजय चौधरींचा अमिरेकन बुलडॉग या जातीचा कुत्रा बंगल्यातून बाहेर पडला. कुत्रा मुख्य रस्त्याने फिरत होता. बुलडॉग कुत्रा असा मोकळा फिरत असल्याचं चोरट्यांनी पाहिलं त्यांनी संधी साधली आणि दुचाकीवर कुत्र्याला पळवून नेलं.
घरी कुत्रा नक्की कुठे गायब झाला हे लक्षात आल्याने शोधाशोध केली मात्र कुठेच कुत्रा न दिसल्याने चौधरींनी लष्कर पोलिसमध्ये स्टेशनमध्ये त्यांनी केली. त्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही चेक केले. तेव्हा कुत्रा कैलास चव्हाणने आपल्या साथीदारासह पळवल्याचं दिसलं.
दरम्यान, पोलिसांनी कैलास चव्हाणची माहिती मिळवली तेव्हा कुत्रा हडपसर परिसरात असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी कैलासला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
थोडक्यात बातम्या-
“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचं, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?
“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”
‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ
‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील