बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

मुंबई | साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार 2021 ची आज घोषणा झाली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांनी 22 भाषांकरिता या पुरस्काराची घोषणा केली आहे. मराठी भाषांकरिता सोनाली प्रकाश नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. मुळ तामिळ भाषेतील हे पुस्तक फ्रेंचसह अन्य 4 भाषांमध्ये अनुवादीत झालं आहे. तर मंजुषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य अकादमी पुरस्कारची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये झाली होती. तेव्हापासून हा पुरस्कार साहित्यिक सन्मान म्हणून साहित्य अकादमीकडून दिला जात आहे. सोनाली नवांगुळ या भारताच्या स्पर्शज्ञान नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या 2008 पासून उपसंपादक आहेत.

त्याचबरोबर त्या रिलायन्स दृष्टी या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करत आहेत. नवांगुळ यांनी नियतकालिकांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून विविध विषयांवर लेखन केले आहे. अनुवादक आणि निवेदिका म्हणून त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलने ‘स्वच्छंद’ हे पुस्तक मेनका प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.

दरम्यान,  मेधा पाटकर- नर्मदा बचाओ आंदोलनाचा बुलंद आवाज, तर ‘स्वच्छंद’ हे ललित सदर लेखन, मुळ लेखक पिस्टोरिअस आणि गियान्ने मेरलो यांचे ड्रीमरनर हे पुस्तक देखील सोनाली नवांगुळ यांनी अनुवादीत केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More