बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साईबाबा मुसलमान असल्याचा आरोप करत मंदिरातून साईंची मूर्ती हटवली!

नवी दिल्ली | दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा यांची मूर्ती दक्षिण दिल्लीच्या शहापूर जाट परिसरात काही समाजकंटकांनी तोडली आहे. ही मूर्ती तोडत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या सर्व प्रकारामुळे सध्या साईबाबांवर श्रद्धा असणाऱ्या भक्तांमध्ये संतापाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या साउथ झोनचे डीसीपी अतुल कुमार यांनी या प्रकरणात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे तसेच याबाबत तक्रार मिळाल्यानंतर भक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचं लक्षात घेऊन या प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याचं सांगितलं.

या व्हिडिओमध्ये एक माणूस साईबाबा हे मुस्लीम असून त्यांचा मृत्यु 1918 मध्ये झाला आणि ते कोणी देव वगैरे नसल्याचं साईबाबांचा  एकेरी उल्लेख करून सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाला याबाबत विचारणा केली असता मूर्ती जुनी झाल्याने ती हटवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य पदम पनवार यांनी असं सांगितलं की, मूर्ती जुनी झाल्याने तिला काढून टाकलं असून मंदिराचं बांधकाम पुन्हा करण्यात येणार आहे तेव्हा नवीन साईबाबांची मूर्ती बसवायची की नाही, याबाबत बैठक घेऊन ठरवण्यात येईल. त्याबरोबरच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल आपण काहीही बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी हा विषय टाळला.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या

…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More