मनोरंजन

“तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!”

Loading...

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सविता भाभी नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. अश्लिल उद्योग मित्र मंडळ या चित्रपट टीमने हटके पद्धतीने चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. या चित्रपटातील ‘सविता भाभी’ या कॉमिक कॅरेक्टरकवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉपी कॅरेक्टर असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला नोटीस पाठवली आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित अश्लिल उद्योग मित्र मंडळ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरने सविता भाभीची भूमिका बजावली आहे.

ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण महासंघाने चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. अश्लिल हा शब्द जरी मराठी असला तरीही हा शब्द सहसा उघडपणे वापरला जात नाही. या चित्रपटामध्ये काहीतरी अश्लिल दाखवलं जाणार असल्याचं या शब्दावरुन प्रेक्षकांना भासवण्यात येत आहे.

अश्लिस शब्दामुळे लोकांची लैंगिक भूक चाळवली जाते. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसते, असा आरोप ब्राह्मण महासंघाच्या आनंद दबे यांनी केला आहे.

Loading...

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असल्याने आता चित्रपटाच्या नावात बदल करता येणार नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. ब्राह्मण महासंघाच्या अश्लिल उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न चित्रपट आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

उस्मानाबादमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त करणाऱ्या टोळीचा हैदोस!

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार गडगडला; दिवसभरात साडेपाच लाख कोटी बुडाले

महत्वाच्या बातम्या-

मुस्लिम आरक्षणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात येईल- देवेंद्र फडणवीस

नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री बच्चू कडूंनी केला लोकलनं प्रवास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या