तिच्या आरोपात तथ्य असेल तर नानांवर कारवाई झालीच पाहिजे!

मुंबई | अभिनेते तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादावर बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीतूनही प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना पाटेकरांवर तनुश्रीने जे काही आरोप केले आहेत, ते ऐकून मला धक्का बसला आहे. तिच्या आरोपात तथ्य असल्यास नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं मत सईने व्यक्त केलं आहे. 

#Me too मोहिमे अंतर्गत बॉलिवूडमधील संस्कारी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप होत आहेत. त्यावर तुम्ही कधीच शांतता पुर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार, अशी आक्रमक प्रतिक्रिया सईने दिली होती. 

दरम्यान, या मोहिमेमुळे अनेक कलाकारांचे किस्से समोर येत आहेत. अनेक कलाकारांनी याच स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय- देवेंद्र फडणवीस

-मी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल!

-येवलेकरांचे उपकार मी कधीच विसरणार नाही- छगन भुजबळ

-जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, मी नानांसोबत आहे!

-…म्हणून भाजपच्या माजी आमदारानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या