Sai Tamhankar | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक मोठं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. याचबरोबर सई सामाजिक प्रश्नी देखील नेहमीच अॅक्टिव असते. अशात तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) याबद्दल मोठं विधान केलं आहे.
सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. यामध्ये तिने सेक्स एज्युकेशनबद्दल आपलं मत मांडलं. मुलाखतीमध्ये तिला सेक्स एज्युकेशन कुठून मिळालं, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली?, असा प्रश्न करण्यात आला होता. यावर तिने मनमोकळे होऊन उत्तर दिले.
“चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल..”
“मला या सगळ्या गोष्टी घरातूनच शिकायला मिळाल्या. मी लहान असतानाच मला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आलं होतं. कोणी ओळखीतले आहेत तर ते असं वागणार नाहीत असे कोणतेही निकष नाहीत. हा चांगला स्पर्श आहे व हा वाईट स्पर्श आहे हेच मला शिकवलं गेलं”, असं सई ताम्हणकर म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, “माझे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केलाय, त्यामुळे कदाचित या गोष्टी शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे.”
View this post on Instagram
“नात्यात सेक्स सर्वात महत्वाचा भाग असतो”
तसेच शाळेत देखील सेक्स एज्युकेशन दिले जायचे. हे दोन स्रोत होते, जे महत्त्वाचे होते, असंही सईने पुढे सांगितलं. पुढे तिने मोठं वक्तव्य केलं.“मला वाटतं की आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिलं जातं. खरं तर तो नात्याचा खूप महत्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. जेव्हा दोन व्यक्ती हे नात्यात असतात, तेव्हा या गोष्टीकडे ते लक्षच देत नाहीत, असं मी खूपदा ऐकलं आहे. नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नातं ऑटो पायलट मोडवर चाललंय व सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतं. यावर चर्चा करण्यासाठी दोघेही जोडीदार इच्छुक व पॅशनेट असणं गरजेचं आहे.”, असं सई म्हणाली.
पुढे सईने फेमिनिझमबद्दलही भाष्य केलं. “अमूक लिंग असलेली व्यक्ती मजबूत आहे व अमूक लिंग असलेली व्यक्ती कमजोर आहे हे कोणी ठरवलं? मला वाटतं की स्त्री व पुरुष दोघेही एकत्र आल्यावर एक सुंदर टीम तयार होते. मी दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहते. त्यामुळे भेदभाव न करता दोन्हीकडे समानतेने पाहणे व समानतेने जगणे हेच खरे फेमिनिझम आहे.”, असं सई म्हणाली.
News Title : Sai Tamhankar talks about sex education
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या दर
“प्रचंड असह्य वेदना..”; किरण माने आयसीयूमध्ये दाखल
पवित्र श्रावणात ‘या’ ज्योतिर्लिंगांचं घ्या दर्शन; IRCTC चे टूर पॅकेज एकदा बघाच
Paris Olympics मध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक; नेमबाजीत ‘या’ जोडीने रचला इतिहास
राज ठाकरेंना ‘सुपारीबाज’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींवर मनसैनिकांकडून हल्ला; अकोल्यात प्रचंड गोंधळ