एक्स पतीसोबतच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली त्या रात्री आम्ही…

Mumbai | मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) कायमच तिच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी चर्चेत असते. मात्र, सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक जीवनावर मोठा खुलासा केला. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतरचे नाते याबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचं नातं

सई ताम्हणकरने 2013 मध्ये अमेय गोसावी (Amey Gosavi) सोबत लग्न केलं. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरीसद्धा, दोघे आजही चांगले मित्र आहेत, असं खुद्द सईने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

तिने सांगितलं की, “घटस्फोटानंतर काही काळ मला अजूनही ‘सई ताम्हणकर गोसावी’ असंच नाव ऐकायला यायचं. अखेर आम्ही भेटायचं ठरवलं. दोन ड्रिंक्स घेतल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. हसू, रडू आणि जीवनाबद्दल गप्पा मारल्या. नंतर काही मित्रही आम्हाला जॉइन झाले आणि त्या रात्री आम्ही चांगला वेळ घालवला

टॅटूबद्दल सईचा मोठा खुलासा

घटस्फोटानंतरही सईने आपल्या लग्नाच्या आणि प्रपोजलच्या दिवसाचा टॅटू कायम ठेवला आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “एक वेळ येते जेव्हा काही नाती संपतात, पण त्या व्यक्तीने दिलेले काही क्षण कायम स्मरणात राहतात. त्यामुळे ते विसरण्याची मला गरज वाटत नाही.”

सई ताम्हणकरच्या (Saie Tamhankar) या वक्तव्यावर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

News Title : Saie Tamhankar Opens Up on Divorce