Saie Tamhankar | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर सईची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चाहत्यांसाठी सई कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सईच्या वैयक्तिक आयुष्याबदल जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सईने मोठा खुालासा केला आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली.
काय म्हणाली सई?
आपल्या उत्तम अभिनयाने आणि हाॅट अदांनी सई (Saie Tamhankar) कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतीमध्ये सई नवनवीन खुलाशे करत असते. दरम्यान, सईने एक असा खुालासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. सई म्हणाली की, मला एकदा एक काॅल आला होता. त्यावेळी मला सांगितलं की, तुम्हाला अशी अशी भूमीका करावी लागेल.
पुढे काय घडलं?
मी म्हटलं (Saie Tamhankar) ठीक आहे. नंतर तो म्हणाला की, त्याधी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल. मी त्याला म्हटलं की हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. 15-20 वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असं घडलं होतं.
View this post on Instagram
“त्यावेळी कोण बसून काय मेसेज करतोय याची पडताळणी करणंही खूप कठीण होतं. अजूनही आपल्याला माहित नसतं की मेसेज करतेय ती व्यक्ती कोण आहे,” असं सई ताम्हणकर म्हणाली.
चांगली माणसं भेटली-
सई (Saie Tamhankar) ही कधी तिच्या लुक्समुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. सईने तिच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, अभिनयात यायचं हे कधीच ठरवलं नव्हतं. मला चांगली माणसं भेटत गेली, चांगल्या संधी मिळत गेल्या. मी सांगलीवरुन थेट मुंबईत आले. पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा या गोजिरवाण्या घरात मालिकेसाठी आले आणि तिथून बाकीचा प्रवास सुरु झाला.
News Title : Saie tamhankar reveals her experienced
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 24 वर्षांनी अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकलबद्दल धक्कादायक खुलासा!
गडकरींच्या बालेकिल्ल्यातच मनसेचा राडा; आता थेट टोलनाकाच फोडला
शेअर बाजारातील मोठ्या घडामोडीनंतर सोन्याचे दर काय?
सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; ऐन श्रावणात भाज्यांचे दर भिडले गगनाला
“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप