Saie Tamhankar | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक मोठं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. सई तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. अशात तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. यामध्ये तिने सेक्स एज्युकेशनबद्दल आपलं मत मांडलं. मुलाखतीमध्ये तिला सेक्स एज्युकेशन कुठून मिळालं, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली?, असा प्रश्न करण्यात आला होता. यावर तिने उत्तर दिलं.
चांगला स्पर्श वाईट स्पर्श-
मला या सगळ्या गोष्टी घरातूनच शिकायला मिळाल्या. मी लहान (Saie Tamhankar) असतानाच मला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आलं होतं. कोणी ओळखीतले आहेत तर ते असं वागणार नाहीत असे कोणतेही निकष नाहीत. हा चांगला स्पर्श आहे व हा वाईट स्पर्श आहे हेच मला शिकवलं गेलं”, असं सई ताम्हणकर म्हणाली.
पुढे ती (Saie Tamhankar) म्हणाली की, माझे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केलाय, त्यामुळे कदाचित या गोष्टी शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे.
View this post on Instagram
सेक्सला कमी महत्त्व-
सईने पुढे सांगितलं की, मला वाटतं की आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिलं जातं. खरं तर तो नात्याचा खूप महत्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. जेव्हा दोन व्यक्ती हे नात्यात असतात, तेव्हा या गोष्टीकडे ते लक्षच देत नाहीत, असं मी खूपदा ऐकलं आहे. नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नातं ऑटो पायलट मोडवर चाललंय व सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतं. यावर चर्चा करण्यासाठी दोघेही जोडीदार इच्छुक व पॅशनेट असणं गरजेचं आहे, असं सई म्हणाली.
News Title : saie tamhankar talks about sex importance in india
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर
“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
“मला 60 दिवसांच्या आत उचललं नाही, तर कंबोज बापाचं नाव बदलणार”
“शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे…”; मंत्रीपदाबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य