सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कुटुंबावर आणखी एक संकट!

Saif Ali Khan 15000 Crore Property in Bhopal May Be Seized by Government

Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक संकटे येत आहेत. नुकताच एका चोरट्याने घरात घुसून सैफवर हल्ला केला होता. या हल्ल्यातून सावरत नाही तोच आता त्यांच्यासमोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. सैफ अली खानच्या (पतौडी) (Pataudi) कुटुंबाची भोपाळमधील (Bhopal) तब्बल १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता (Property) सरकार ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे.

शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत (Enemy Property Act) ही मालमत्ता सरकारची होऊ शकते. २०१५ पासून भोपाळमधील (Bhopal) ऐतिहासिक संस्थानांच्या मालमत्तेवर बंदी होती. या प्रकरणात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) (जबलपूर) (Jabalpur) पतौडी कुटुंबाला (Pataudi Family) अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, पतौडी कुटुंबाने दिलेल्या वेळेत आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे आता सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. असे असले तरी, पतौडी कुटुंबाकडे अजूनही डिव्हिजन बेंचमध्ये (Division Bench) आदेशाला आव्हान देण्याचा पर्याय शिल्लक आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

१९६८ मध्ये लागू करण्यात आलेल्या शत्रू मालमत्ता कायद्यानुसार (Enemy Property Act), फाळणीनंतर पाकिस्तानात (Pakistan) स्थलांतरित झालेल्या लोकांच्या भारतात राहिलेल्या मालमत्तेवर केंद्र सरकारचा (Central Government) अधिकार आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारने नवाब हमीदुल्ला खान (Nawab Hamidullah Khan) यांच्या मालमत्तेची कायदेशीर वारसदार त्यांची मोठी मुलगी आबिदा (Abida) असल्याचे म्हटले होते, जी फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाली होती. त्यामुळे ही मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत येते, असे सरकारने म्हटले होते. (Saif Ali Khan)

सैफची आजी साजिदा सुलतान यांचा मालमत्तेवर दावा

दुसरीकडे, नवाबाची दुसरी मुलगी साजिदा सुलतान (Sajida Sultan) यांचे वंशज (सैफ अली खान आणि शर्मिला टागोर) (Sharmila Tagore) या मालमत्तेवर आपला दावा सांगत आहेत. साजिदा सुलतान या नवाब पतौडी यांच्या (Nawab Pataudi) आई आणि सैफ अली खानची (Saif Ali Khan) आजी होत्या. त्या आयुष्यभर भारतातच राहिल्या. त्यांची बहीण राबिया सुलतान (Rabia Sultan) या देखील भारतातच राहत होत्या.

आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या मुदतीत पतौडी कुटुंबाने (Pataudi Family) आपली बाजू न मांडल्याने, सरकार ही १५ हजार कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरुद्ध पतौडी कुटुंबाला डिव्हिजन बेंचमध्ये (Division Bench) दाद मागण्याचा पर्याय खुला आहे. (Saif Ali Khan)

Title : Saif Ali Khan 15000 Crore Property in Bhopal May Be Seized by Government

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .