सैफ अली खान हल्ला प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack l अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार चाकूने (Sharp Knife) वार करणाऱ्या आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. हा आरोपी कोण आहे? त्याचे नाव काय? याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांना (Police) मिळालेली नाही. आज तिसऱ्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे (Clues) आलेले नाहीत.

पोलिसांची ३५ पथके (Teams) या चोराच्या मागावर (Trail) आहेत. पण, चोराचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. हा चोर गुजरातला (Gujarat) पळाल्याची चर्चा होती. पोलीस तिकडेही तपास (Investigation) करत आहेत. त्यानंतर हा चोर मध्यप्रदेशात लपल्याची खबर मिळताच पोलीस या चोराचा पाठलाग करत करत मध्यप्रदेशात गेले आणि त्यांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पण तोच चोर आहे की त्याच्यासारखा दिसणारा दुसरा व्यक्ती आहे, हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.

मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) एकाला ताब्यात; खरा आरोपी की दुसराच? :

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला ताब्यात घेतले आहे. पण ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अधिकृत माहिती (Official Information) देण्यात आलेली नाही. खरा आरोपी पकडला की चोरासारखा दिसणारा व्यक्ती पकडला, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. काल पोलिसांनी शाहीद (Shahid) नावाच्या एका तरुणाला पकडले होते.

सैफवर हल्ला करणाऱ्यासारखाच तो दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी (Thorough Investigation) केली. पण चौकशीत तो चोर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेला व्यक्तीच चोर आहे की नाही, हे अद्याप उलगडलेले नाही.

Saif Ali Khan Attack l लोकेशन ट्रेस (Location Trace), पण आरोपीचा पत्ता नाही

सैफवर झालेल्या हल्ल्याला तीन दिवस झाले आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांची ३५ पथके यासाठी काम करत आहेत. चोराचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहून त्याचा फोटोही (Photo) पोलिसांनी मिळवला आहे.

चोराचा फोटो सार्वजनिक (Public) करण्यात आला आहे. मात्र, तरीही पोलिसांना अद्याप चोर सापडलेला नाही किंवा चोराची काहीच माहिती मिळालेली नाही. तो कुठे राहतो, काय करतो? तो मुंबईचाच (Mumbai) आहे का? आदी माहिती अद्यापही पोलिसांना मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या चोराच्या कुटुंबातील (Family) कुणीही समोर येऊन काहीही भाष्य केलेले नाही.

News Title : Saif Ali Khan Attack: Accused still untraceable after 3 days, one detained from Madhya Pradesh

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .