सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश!

Saif Ali Khan Attacker Arrested

मुंबई | अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खानवरील हल्लाप्रकरणी आरपीएफ (RPF) पोलिसांनी शनिवारी आकाश कनोजिया (Akash Kanojia) (३१) या संशयिताला छत्तीसगडमधील दुर्ग (Durg) स्टेशनवर ताब्यात घेतले. त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पथक रायपूरला (Raipur) रवाना झाले आहे.

मोबाईल खरेदीने लावला सुगावा

हल्ल्यानंतर कनोजियाने कपडे बदलल्याने तो सराईत गुन्हेगार (Habitual Offender) असल्याचे उघड झाले. आधी तो वांद्रे स्टेशनला (Bandra Station), नंतर दादरला (Dadar) गेला. तेथून त्याने एका मोबाईलच्या दुकानातून मोबाईलची खरेदी केली. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) तो निळ्या कपड्यांमध्ये (Blue Clothes) दिसतो, अशी माहिती सूत्रांनी (Sources) दिली.

संशयित ज्ञानेश्वर एक्स्प्रेसने (Dnyaneshwari Express) प्रवास करत असल्याची माहिती फोटोसह (Photo) जुहू पोलीस ठाण्याने (Juhu Police Station) पाठवली होती. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे (Video Calling) संपर्क साधण्यात आला.

करीना कपूर खानचा जबाब नोंदवला

पोलिसांनी शुक्रवारी करीना कपूर खान हिचा जबाब घेतला. झटापटीदरम्यान (Scuffle) हल्लेखोर (Attacker) चिडला. त्याने सैफवर वार केल्याने मी खूप घाबरले. मात्र, घरातील एकही वस्तू किंवा दागिना (Jewelry) चोरीला (Theft) गेला नसल्याचे करीनाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे हल्लेखोराने चोरीच्या हेतूनेच सैफवर हल्ला केला की त्याचा दुसरा हेतू होता, याबद्दलची माहिती चौकशीतून उघड होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

कनोजियाचे छायाचित्र (Photograph) आणि संबंधित माहिती जुहू पोलिसांनी आरपीएफला पुरवली होती. सैफ हल्ला प्रकरणातील एक संशयित लोकमान्य टिळक टर्मिनस कोलकाता (Kolkata) शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची माहिती जुहू पोलिसांनी आरपीएफला दिली. मुंबई पोलिसांकडून माहिती मिळताच छत्तीसगडमधील दुर्ग येथील आरपीएफ जवानांच्या (Jawans) पथकाने रेल्वे स्टेशनवर (Railway Station) कनोजियाला पकडले.

दुर्ग आरपीएफ पोलीस ठाण्यातून तेथील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना व्हिडिओ कॉल (Video Call) केला. त्यानुसार मुंबई पोलीस संशयिताचा ताबा रायपूरला जाऊन घेणार आहेत, अशी माहिती आरपीएफ, बिलासपूर झोनचे (Bilaspur Zone) आयजी (IG) मुन्वर खुर्शीद (Munwar Khurshid) यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .