सैफ अली खान हल्ला प्रकरणात क्राइम ब्रांचचा वांद्रे पोलिसांवर आरोप, नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan

Saif Ali Khan Attack | अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला (Attack) दोन दिवस उलटून गेले आहेत, तरीही आरोपी अद्याप सापडलेला नाही. सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्यामुळे आरोपीचा चेहरा (Face) सर्वांना समजला आहे, पण तरीही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीये. आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) ३५ पथके (Teams) तयार करण्यात आली आहेत. (Saif Ali Khan Attack)

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी जिन्यावरून उतरून निघून गेला. तिथल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा कैद झाला आहे. आरोपी सैफच्या घरातून निघाल्यानंतर वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या (Bandra Railway Station) सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. दादरच्या (Dadar) एका दुकानातून (Shop) त्याने हेडफोन (Headphone) खरेदी केल्याचेही दिसतेय. पण हा आरोपी अद्याप न सापडल्याने मुंबई पोलिसांवरील दबाव वाढत चालला आहे.

पोलिसांच्या पथकांमध्येच जुंपली

आता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या पोलीस पथकांमध्येच आपसात जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबई गुन्हे शाखेने वांद्रे पोलिसांच्या तपासावर टीका केली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अपेक्षित असलेली तात्काळ कारवाईची पावले उचलली नाहीत, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. (Saif Ali Khan Attack)

सैफ अली खान वांद्रे येथील सतगुरू शरण (Satguru Sharan) इमारतीत राहतो. हा भाग वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Jurisdiction) येतो. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर वांद्रे पोलीस सैफच्या घरी दाखल होणे स्वाभाविक आहे.

वांद्रे पोलिसांवर टीकेची झोड

वांद्रे पोलिसांनी अन्य यंत्रणांना (Agencies) उदाहरणार्थ, गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना (Government Railway Police – GRP) अलर्ट (Alert) केले नाही, असे मुंबई गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांचे (Investigating Officers) म्हणणे आहे. असे झाले असते तर हल्लेखोराचा पळण्याचा एक मार्ग बंद झाला असता. हल्ला झाल्यानंतर लगेच पावले उचलली असती, तर हल्लेखोराला पकडता आले असते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने (Senior Officer) सांगितले.

तपासाला उशीर

घटना घडल्यानंतर जवळपास साडेतीन तास त्यांनी जवळच्या अन्य पोलीस स्टेशन्सना (Police Stations), क्राइम ब्रांचला (Crime Branch) याबद्दल कळवलेच नाही, असा आरोपही गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. या दिरंगाईमुळे (Delay) आरोपीला पळून जाण्यास पुरेसा वेळ मिळाला, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Saif Ali Khan Attack)

Title : Saif Ali Khan Attack Crime Branch slams Bandra Police for delayed action

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .