Saif Ali Khan Attack | बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी चाकू हल्ला (Knife Attack) होऊन ५३ तास उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही पोलिसांना हल्लेखोराचा शोध लागलेला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सैफवर लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे. त्याच्या पाठीत (Back) खुपसलेला सुऱ्याचा (Knife) तुकडा डॉक्टरांनी काढला आहे. सैफच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्याला आयसीयूमधून (ICU) स्पेशल वॉर्डमध्ये (Special Ward) हलवण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) सैफच्या आरोग्य विम्याच्या दाव्याचे (Claim) कागदपत्र समोर आले आहे.
आरोग्य विम्याचा दावा आणि निवा बुपाचे (Niva Bupa) स्पष्टीकरण
बुधवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास सैफवर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. सैफकडे निवा बुपा कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) आहे. याच कंपनीकडे सैफच्या शस्त्रक्रियेची रक्कम क्लेम (Claim) करण्यात आली. त्याबद्दलचे कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर निवा बुपाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर निवा बुपाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. “सैफ अली खानसोबत नुकताच घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी आम्ही मनोकामना करतो.
मिस्टर खान आमचे पॉलिसी धारक (Policy Holder) आहेत. ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आमच्याकडे कॅशलेस सुविधा (Cashless Facility) पुरवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर आम्ही उपचार सुरू करण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम मंजूर केली. संपूर्ण उपचार झाल्यानंतर आमच्याकडे अंतिम बिल्स (Final Bills) येतील. पॉलिसीच्या अटी, शर्तींनुसार (Terms and Conditions) त्यावर कार्यवाही केली जाईल,” अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या संकटाच्या समयी आम्ही मिस्टर खान आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, असा उल्लेख कंपनीने निवेदनात केला आहे.
संशयित हल्लेखोराची ओळख पटली?
दरम्यान, सैफच्या संशयित हल्लेखोराची ओळख पटल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, ११ डिसेंबरला (December 11) याच हल्लेखोराने चोरीचा (Theft) प्रयत्न केला होता, जो फसला होता, अशीही माहिती पुढे येत आहे.
सैफ अली खान का इलाज बीमा के पैसों से हो रहा है ।
सैफ को पता था की जिंदगी मे बीमा की जरूरत पड़ सकती है । #SaifAliKhanAttacked #SaifAliKhan #SaifAliKhanNews #SAIFALIKHANATTACK pic.twitter.com/hxD6jE3sEP— Satyam Pandey पंडितजी (@Satyampandey499) January 17, 2025
Title : Saif Ali Khan Attack his health insurance document goes viral
महत्वाच्या बातम्या-
संघाची भाजप मंत्र्यांसाठी ‘पाठशाला’; मोदीनंतर आता संघ देणार कानमंत्र
महाकुंभमधील 95 वर्षीय अघोरी बाबाची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाले ‘येणारा काळ हा’
कसं असेल आजचं हवामान?, IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची आकडेवारी समोर, बघून तुम्हालाही धक्का बसेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!