Saif Ali Khan Attack l आज बॉलिवूड विश्वात एक धक्कादायक घटना घडली. अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सैफची पत्नी करीना कपूरच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
करीनाच्या टीमने दिली माहिती :
यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. यावेळी सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच इतर कुटुंबीय मात्र ठीक आहेत. तसेच या धक्कादायक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरूआहे अशी माहिती करीना कपूरच्या टीमकडून देण्यात आली आहे.
या घटनेत चोराने सैफ अली खानवर हल्ला केला, त्यावेळी सैफच्या मणक्याजवळ आणि हातावर वार झाला आहे. मात्र आता सैफवर लिलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली असून त्याची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
Saif Ali Khan Attack l …त्यावेळी करीना कुठे होती? :
दरम्यान, सैफवर हल्ला झाला त्यावेळी करीना घरात होती की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आदल्या रात्री तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये डिनर पार्टीचे फोटो देखील पोस्ट केले होते. त्यावेळी बहीण करिश्मा कपूर, मैत्रिणी सोनम आणि रिया कपूर यांच्यासोबत ती पार्टी करत असल्याचे फोटो होते.
याशिवाय सैफवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यावेळी रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी देखील त्या चोराने वाद केला आहे. मात्र आता त्या चोराने हल्ला का केला याचा पोलीस तपास करत आहेत.
News Title : Saif Ali Khan attack kareena kapoor Team Statement
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळली धक्कादायक बाब!
सैफसोबत आधी वाद झाला नंतर हल्ला?, अत्यंत खळबळजनक माहिती समोर
संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….
सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर
मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर