Saif Ali Khan Attack New VIDEO | अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री वांद्रे येथील राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील या प्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्यावर एका अज्ञात चोराने घरात घुसून वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Saif Ali Khan Attack New VIDEO)
त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा लागल्या आहेत. यापैकी दोन जखमा अत्यंत खोल असून एक जखम ही पाठीच्या कण्याजवळ लागली आहे. हल्ला झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सैफ वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत राहतो. याच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर हा सर्व प्रकार घडला.
करीनाचा ‘तो’ व्हिडिओ समोर
अशात हल्ला झाला त्या रात्री करीना कपूरचं फुटेज समोर आलंय. यामध्ये करीना काही जणांशी संवाद साधताना दिसून येत आहे. तसेच, पती सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना घरात होती का?, याबाबतही बऱ्याच चर्चा सुरू आहेत. तिने काल रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये करीना बहीण करिश्मा कपूरसोबत पार्टी करताना दिसून आली.
करीनाने सोशल मीडियावर काल रात्री एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि करिश्मा कपूर एकत्र असल्याचे पोस्टद्वारे दिसून येत आहे. करीनाने शेअर केलेली ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी करिश्माने देखील पोस्ट केली. पार्टी झाल्यानंतर करिना कपूर घरी गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attack New VIDEO)
View this post on Instagram
नेमकं काय झालं?
मध्यरात्री 2 ते अडीच वाजता सैफ अली खानवर एका चोराने चाकूने वार केला. सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती त्याच्या घरात रात्रभर बसून होती. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु होता. दोघांच्या वादाचा आवाज सैफला आला. त्यानंतर काय झाले म्हणून पाहण्यासाठी आला असता सैफसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. (Saif Ali Khan Attack New VIDEO)
हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आता हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी काय संबंध होता? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलिस तपास करत आहेत.
News Title : Saif Ali Khan Attack New VIDEO
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळली धक्कादायक बाब!
सैफसोबत आधी वाद झाला नंतर हल्ला?, अत्यंत खळबळजनक माहिती समोर
संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….
सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर
मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर