Saif Ali Khan News l अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफाली खान जखमी झाला असल्याने त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती :
या हल्ल्यात सैफच्या शरीरावर एकूण सहा जखमा लागल्या आहेत. यापैकी दोन जखमा अत्यंत खोल असून एक जखम ही पाठीच्या कण्याजवळ लागली आहे. हल्ला झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सैफ वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत राहतो. याच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर हा सर्व प्रकार घडला आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास मुंबई गुन्हे पोलीस शाखा करत आहे. तसेच सैफच्या घरात शिरलेला हा चोर लिफ्ट किंवा इमारतीच्या मुख्य लॉबीमधील CCTV फुटेजमध्ये कैद झाला नाही. त्यामुळे इमारतीच्या शाफ्टमधून तो चोर 12 मजले चढून गेला असावा, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
Saif Ali Khan News l नेमकं काय घडलं? :
– अभिनेता सैफ अली खानवर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला.
– मुंबईच्या वांद्र्यातील निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला.
– काल रात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरी शिरला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
– यावेळी अज्ञात व्यक्तीला पाहून घरातील मोलकरणीने जोरजोरात आरडाओरड सुरु केली.
– मोलकरणीने आरडाआरोड केल्याने सैफला जाग आली.
– त्यानंतर सैफ अली खानची अज्ञात व्यक्तीसोबत झटापट देखील झाली.
– मात्र या झटापटीत सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून 6 वार करण्यात आले.
– तसेच या हल्ल्यात सैफच्या शरीरावर देखील 2 मोठ्या जखमा झाल्या.
– त्यानंतर मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
– मात्र त्या जखमा गंभीर असल्याने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
News Title : Saif Ali Khan Attack News
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली!
सैफवरील हल्ला पुर्वनियोजित कट?; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
सैफच्या हल्ल्यानंतर करीना कपूरने दिली पहिली प्रतिक्रिया!
मोठी बातमी! सैफवरील हल्ल्यानंतरचं CCTV फुटेज समोर