Saif Ali Khan Attack | अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकूने हल्ला करण्यात आला. घरात घुसलेल्या अज्ञात चोराने सैफवर हा हल्ला केला. चोराशी सैफची थोडी झटापट झाली आणि चोराने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. त्यानंतर तो चोर पळून गेला. मध्यरात्री 2 ते अडीच वाजता हा थरार घडला. सध्या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Saif Ali Khan Attack )
मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानच्या मानेवर धारदार शस्त्राची 10 सेमीची जखम झाली आहे. तसेच, त्याच्या हातावर आणि पाठीवर देखील काही जखमा झाल्या आहेत. हल्लेखोराने सैफच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करुन पाठीत अडकलेलं हे धारदार शस्त्र काढण्यात आलं.
हल्लेखोराचा मोलकरीणसोबत सुरू होता वाद-
याचदरम्यान हल्लेखोराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती त्याच्या घरात रात्रभर बसून होती. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु होता. दोघांच्या वादाचा आवाज सैफला आला. त्यानंतर काय झाले म्हणून पाहण्यासाठी आला असता सैफसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. (Saif Ali Khan Attack )
हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आता हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी काय संबंध होता? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या घरात पॉलिशिंगचं काम सुरू आहे. ते काम करणाऱ्या व्यक्तींपैकी, कामगारांपैकीच कोणी हल्लेखोर आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
मोलकरणीच्या भूमिकेवर पोलिसांना संशय
दरम्यान, पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेवर संशय आहे. मोलकरणीने चोराच्या प्रवेशाची सोय केली होती का? असा संशय त्यांना आहे. वैद्यकीय उपचारानंतर मोलकरणीचा जबाब नोंदवला जाईल. तो चोर होता की आणखी कोणी? त्याचा हेतू फक्त चोरीचा होता का? त्याला कोणी टार्गेट केले होते का?याबाबत आता तपास केला जातोय.
या हल्ल्यात मोलकरणीवर देखील वार करण्यात आलाय.सैफ सोबत त्याच्या मोलकरणीला देखील दुखापत झाली आहे.या हल्ल्यात तिच्या हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाली असून तिच्यावर देखील उपचार करण्यात आले आहेत. या सर्व प्रकाराने संपूर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. (Saif Ali Khan Attack )
News Title : Saif Ali Khan Attack Police Investigate
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….
सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर
मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं
सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत