सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं

Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attacked | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attacked) मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आता कसून तपास केला जातोय.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. सैफ अली खानच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे फोन देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री चाकू हल्ला झाला. सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैफवर चोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत. तर, एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे.

या घटनेनंतर सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून या सर्व प्रकारामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे. (Saif Ali Khan Attacked)

पोलिसांनी सैफच्या घरी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे.

News Title : Saif Ali Khan Attacked 4 people into police custody

महत्वाच्या बातम्या-

सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा

घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?

ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

‘माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं’; वाल्मिक कराडच्या पत्नीचे गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .