Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या चोराने (Thief) त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीररित्या जखमी (Seriously Injured) झाला. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकूने वार केला आणि तो तुकडा पाठीतच (Back) अडकून राहिला. तसेच, सैफच्या मानेवर (Neck) १० इंचाचा वार करण्यात आला आणि त्याच्या हातावरही (Hand) खोल जखमा (Deep Wounds) झाल्या.
रात्री अडीच वाजता सैफला मुंबईतील (Mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, शुद्धीवर (Conscious) आल्यावर सैफने डॉक्टरांशी संवाद साधला. त्याने डॉक्टरांना काय प्रश्न विचारला, हे स्वतः डॉक्टरांनीच सांगितले आहे.
सैफच्या पाठीत सहा सेंटीमीटर (Centimeter) आत शिरला होता चाकू
चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात सैफच्या पाठीत चाकूचा तुकडा सहा सेंटीमीटरपर्यंत आत शिरला होता. सुदैवाने, चाकू स्पायनल कॉर्डपासून (Spinal Cord) दोन मिमी (mm) दूर राहिल्याने, सैफच्या स्पायनल कॉर्डला कोणतीही इजा झाली नाही.
शुद्धीवर आल्यावर सैफने डॉक्टरांना विचारले, “डिस्चार्ज (Discharge) कधी मिळणार?”
सैफच्या पाठीतील चाकूचा तुकडा काढणारे न्यूरो सर्जन (Neurosurgeon) डॉ. नितीन डांगे (Dr. Nitin Dange) यांनी शस्त्रक्रियेनंतर सैफची भेट घेतली. यावेळी सैफने त्यांचे आभार मानले आणि विचारले, “थँक्यू डॉक्टर (Doctor), आता मला डिस्चार्ज कधी मिळणार?”
सैफची प्रकृती स्थिर (Stable); दोन-तीन दिवसांत मिळणार डिस्चार्ज
सैफच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याची तब्येत आता उत्तम आहे. दोन-तीन दिवस त्याची तब्येत कशी राहते ते पाहून सोमवारपर्यंत (Monday) डिस्चार्ज देऊ. सैफच्या (Saif Ali Khan ) पाठीत झालेली जखम खोल आहे. तिथे पाणी (Water) देखील आल्याने इन्फेक्शनचा (Infection) धोका आहे. त्यामुळे काही दिवस त्याला सक्तीची विश्रांती (Bed Rest) घ्यावी लागणार आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.
रक्तबंबाळ अवस्थेतही सैफ वाघासारखा रुग्णालयात आला – डॉ. नीरज उत्तमानी (Dr. Niraj Uttamani)
लीलावती रुग्णालयाचे सीईओ (Chief Executive Officer) डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, “वरिष्ठ डॉक्टरांपैकी (Senior Doctors) रुग्णालयात त्याला भेटणारा पहिला डॉक्टर मी होतो. मी त्याला पाहिले तेव्हा तो रक्तबंबाळ झाला होता, पण तो वाघासारखा (Like a Tiger) रुग्णालयात आला. त्याने स्ट्रेचर (Stretcher) किंवा व्हीलचेअर (Wheelchair) वापरली नाही. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा तैमूरही (Taimur) होता.” (Saif Ali Khan )
Title : Saif Ali Khan attacked by thief admitted to Lilavati Hospital
महत्वाच्या बातम्या-
थरकाप उडवणारी घटना! मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं, धक्कादायक कारण समोर
‘या’ ठिकाणी कधीही गप्प बसू नका, नाहीतर तुम्ही मूर्ख ठराल
सैफ अली खानच्या हॉस्पिटलचा खर्च समोर, सोशल मीडियावर कागदपत्र व्हायरल
“फडणवीसांनी मुंडेंच्या मैत्रीखातर करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं”
संघाची भाजप मंत्र्यांसाठी ‘पाठशाला’; मोदीनंतर आता संघ देणार कानमंत्र