Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याला फोन केला होता, पण त्या अधिकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जर करीनाने त्याऐवजी पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) फोन केला असता, तर यंत्रणा तात्काळ कार्यान्वित होऊन आरोपीला लगेचच ताब्यात घेतले असते, असे पोलिसांचे (Police) म्हणणे आहे.
नेमके काय घडले?
हल्लेखोर मोहम्मद शरीफुल (Mohammad Shariful) सध्या पोलीस कोठडीत (Police Custody) आहे. ज्या रात्री सैफवर हल्ला झाला, त्या रात्री करीना कपूरने (Kareena Kapoor) एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याला फोन केला होता. परंतु, त्या अधिकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर करीनाने थेट रुग्णालयात धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळाली. दरम्यान, करीनाने आधीच १०० या पोलीस नियंत्रण कक्षाच्या (Police Control Room) क्रमांकावर संपर्क साधला असता, तर नाकाबंदी (Nakabandi) करून आरोपीला तात्काळ अटक करणे शक्य झाले असते, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Saif Ali Khan)
सराईत गुन्हेगार
सैफ राहत असलेल्या इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये (Corridor) सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) नाहीत. तसेच, या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी (Security Guards) एक जण केबिनमध्ये (Cabin) तर दुसरा गेटवर (Gate) झोपला होता, असे तपासात समोर आले आहे.
आरोपीने दहाव्या मजल्यापर्यंत जिन्याने (Stairs) आणि अकराव्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरील पाईपचा (Pipe) वापर केला. आवाज होऊ नये म्हणून त्याने स्वतःचे बूट बॅगेत (Bag) ठेवले होते. पळून जाताना त्याने कपडे बदलले आणि स्वतःचा फोन (Phone) बंद ठेवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर, तो बांगलादेशमध्येही (Bangladesh) सराईत गुन्हेगार (Criminal) असावा, असा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शरीफुलला पुन्हा ‘सद्गुरू शरण’ इमारतीमध्ये नेऊन, सैफवरील हल्ल्याचे पोलीस नाट्यरूपांतरण (Recreation) करतील. त्यामधून आणखी महत्त्वाची माहिती उघडकीस येईल, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Saif Ali Khan)
मुलांची खेळणी का हलवली?
सैफ अली खान राहत असलेल्या ‘सद्गुरू शरण’ इमारतीत, सोमवारी दुपारी त्याच्या मुलांची खेळणी हलवताना काही कर्मचारी दिसले. सैफच्या घरात सध्या फ्लोरिंगचे (Flooring) काम सुरू असल्याने, ही खेळणी हलवली जात आहेत का, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे, सैफवर हल्ला झाल्यानंतर सुरक्षेचे तीन तेरा वाजले असताना, तो आणि त्याचे कुटुंबीय घर बदलत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली.
फेस रेकग्नायजेशन अॅपची (Face Recognition App) मदत
आरोपीने अपार्टमेंटमधून (Apartment) पळून जाताना तोंडावरचा कपडा काढला होता. पोलिसांनी (Police) फेस रेकग्नायजेशन अॅपच्या (Face Recognition App) मदतीने अंधेरी (Andheri) ते वांद्रे (Bandra) परिसरात त्याचा शोध घेतला. तो १ आणि ९ जानेवारीला अंधेरीमध्ये (Andheri) दिसला होता. ९ जानेवारीचे फुटेज (Footage) तपासल्यानंतर, तो अंधेरीत ज्या मजुरांच्या ठेकेदारासोबत गेला होता, त्याच्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिस त्या ठेकेदारापर्यंत पोहोचले. त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. (Saif Ali Khan)
Title : Saif Ali Khan Attacked Kareena Kapoor Call to Police