घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?

Saif Ali Khan

Saif Ali Khan Attacked | नवाब सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या वृत्तामुळे संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे. सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. मध्यरात्री 2 ते अडीच वाजता हा सर्व प्रकार घडला. सध्या सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Saif Ali Khan Attacked)

मध्यरात्री सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैफवर चोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लिलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. (Saif Ali Khan Attacked)

सैफवर चोराने चाकूहल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ दुखापत झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. चोराने चाकूने वार करत तिथून पळ काढला. या सर्व प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वृत्तामुळे सैफ अली खानचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.

घटनेचा तपास सुरू

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके देखील तयार करण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणाचा आता कसून तपास केला जातोय.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. सैफ लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत. (Saif Ali Khan Attacked)

News Title :  Saif Ali Khan Attacked What exactly happened

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

‘माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं’; वाल्मिक कराडच्या पत्नीचे गंभीर आरोप

दिवसाची सुरुवातच शुभवार्ताने होईल, आज स्वामी ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं

…तो एक पुरावा अन् वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .