सैफवर हल्ला करणाऱ्याची धक्कादायक कबुली, म्हणाला ‘मी फक्त…’

Saif Ali Khan Attacker Arrested

Saif Ali Khan Attacker Arrested l अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं (Knife) हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) तीन दिवसांनंतर यश आले आहे. मोहम्मद शहजाद (Mohammad Shahjad) असे या आरोपीचे नाव असून तो बांगलादेशी (Bangladeshi) नागरिक (Citizen) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शनिवारी (Saturday) रात्री २ वाजता ठाण्यातील (Thane) कासारवडवलीतील (Kasarvadavali) लेबर कॅम्पमधून (Labour Camp) आरोपीला अटक करण्यात आली. त्याला पकडण्यासाठी १०० पेक्षा जास्त पोलिसांची (Police) कुमक (Force) गेली होती. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झाडीत (Bushes) लपून बसला होता. अखेर सात तासांच्या सर्च ऑपरेशननंतर (Search Operation) आरोपीला पकडण्यात यश आले.

Saif Ali Khan Attacker Arrested l आरोपीची कबुली (Confession) आणि गरज :

मोहम्मद शहजाद याचे वय ३० वर्षे असून मला फक्त ५० हजारांची गरज होती. त्यासाठी चोरी करण्याचा प्रयत्न (Attempt to Rob) केल्याचे त्याने सांगितले. कोर्टात (Court) हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

आरोपीचा (Accused) बांगलादेश (Bangladesh) ते मुंबई (Mumbai) प्रवास :

हल्लेखोर मोहम्मद शहजाद हा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून बांगलादेशचा जन्मदाखला (Birth Certificate) हस्तगत (Seized) करण्यात आला आहे. सात ते आठ महिन्यांपूर्वी तो सिलीगुडीमार्गे (Siliguri) मुंबईत आला होता. बेकायदेशीरपणे (Illegally) भारतात आल्यानंतर त्याने तीन नावे बदलली. विजय दास (Vijay Das) असे नाव लावून तो मुंबईत एका हाऊस किपिंग एजन्सीमध्ये (Housekeeping Agency) काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सैफवर हल्ला केल्यानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) रिलीज (Release) झाले. त्यामुळे घाबरलेला मोहम्मद शहजाद बांगलादेशला पळण्याच्या (Escape) तयारीत होता आणि त्यासाठी तो अनेकांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे.

मोहम्मद शहजाद याचा बांगलादेशातील पत्ता (Address) हाती लागला आहे. तो बांगलादेशातील नाल सिटीतील (Nal City) बतायाराज (Batajaraj) इथला रहिवासी आहे. झलोकाठी (Jhalokati) जिल्ह्यात त्याचे वास्तव्य होते.

News Title : Saif Ali Khan Attacker Arrested: Accused confesses to crime, Bangladeshi national

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .