Saif Ali Khan Attacker l अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री (Midnight) घरात घुसलेल्या हल्लेखोराने जीवघेणा हल्ला (Deadly Attack) केला. त्यात सैफ अली खान गंभीर जखमी (Seriously Injured) झाला. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला हल्ल्याच्या ३२ तासांनी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले. हल्ल्याच्या संध्याकाळी हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) समोर आला होता. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (Mohammad Shariful Islam Shahjad) असे हल्लेखोराचे नाव आहे.
बारीक शरीरयष्टी (Lean Physique) असलेला ३० वर्षांचा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला. त्याचा चेहरा (Face) देखील त्यात दिसला. त्याच्याकडे पाहून तो सैफवर हल्ला करू शकतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, पोलीस तपासात (Police Investigation) शहजादने तो कुस्तीपटू (Wrestler) असल्याचा खुलासा केला आहे. सैफवर हल्ला करणे त्याच्यासाठी कसे सोपे होते याचाही त्याने खुलासा केला आहे.
बारीक अंगकाठी असलेल्या शहजादसमोर सैफची शक्ती (Strength) कमी कशी पडली? :
अभिनेता सैफ अली खान वयाच्या साठीतही (Sixties) तंदुरुस्त (Fit) आहे. त्याच्या भरभक्कम शरीरासमोर (Strong Body) बारीक अंगकाठी असलेला शहजाद त्याला रक्तबंबाळ (Bleeding) करून गेला. शहजादसमोर सैफची शक्ती कमी कशी पडली असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर अखेर पोलीस चौकशीत (Police Interrogation) समोर आले आहे. शहजाद हा कुस्तीपटू असल्याने तो सैफला पुरून उरला, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
Saif Ali Khan Attacker l शहजाद निघाला राष्ट्रीय कुस्तीपटू :
मुंबई पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शहजाद हा मूळचा बांगलादेशी (Bangladeshi) असून तो तिथला कुस्तीपटू आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर (National Level) कुस्ती स्पर्धा (Wrestling Competitions) खेळल्या आहेत. कमी वजन (Light Weight) असलेल्या गटात (Category) तो कुस्ती खेळत होता. बेरोजगारीमुळे (Unemployment) तो भारतात (India) आला, असे त्याने सांगितले.
“मी चपळ (Agile) आणि लवचिक (Flexible) आहे” – शहजाद :
सैफला पुढून मारणे कठीण होते, मग सैफ अली खानवर मागून हल्ला कसा केला? असा प्रश्न शहजादला पोलिसांनी चौकशीत विचारला असता, शहजाद म्हणाला, “मी खूप चपळ आहे. मी खेळाडू (Player) आहे. मी जिल्हास्तरीय (District Level) कुस्तीपटू आहे. बांगलादेशच्या (Bangladesh) राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा खेळलो आहे. अनेक वर्षे कमी वजनाच्या वर्गवारीत कुस्ती खेळल्याने माझे शरीर चपळ आणि लवचिक आहे. त्यामुळे मी छोट्या जागेतून आत शिरणे, उड्या मारण्यात (Jumps) सक्षम (Capable) आहे. त्यामुळे मी हे करू शकलो.”
पोलिसांकडून (Police) हल्ल्याचा सीन रिक्रिएट (Scene Recreation) होणार :
शहजादने पोलीस चौकशीत दिलेल्या या सगळ्या माहितीची पोलीस शहानिशा (Verification) करणार आहेत. हल्ल्याचा सीन रिक्रिएट करताना शहजादकडून या सगळ्या गोष्टी पुन्हा करून घेतल्या जाणार आहेत. त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच शहजाद बांगलादेशमधून भारतात कसा आला? तो खरंच कुस्तीपटू आहे का? याच्यामागे कोणाचा हात होता? मुंबईतील काही लोक याच्यामागे आहेत का? कोणीकोणी त्याला मदत केली? या सगळ्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
News Title : Saif Ali Khan Attacker: National level wrestler reveals how he overpowered Saif