“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Saif Ali Khan | नवाब तथा अभिनेता सैफ अली खान हा आपल्या प्रोफेशल लाईफबरोबरच पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत राहत असतो. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांवर आणि पात्रांवर खूप प्रयोग केले आहेत. सैफने आपल्या  अभिनय कारकि‍र्दीत अनेक वेळा खूप वेगळे पात्र निवडले (Saif Ali Khan) आहेत. त्याच्या पात्र निवडीने चाहत्यांना बऱ्याचदा आश्चर्यचकित केले.

सैफ अली खान याचा आज 16 ऑगस्टरोजी वाढदिवस आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. सैफ अली खान अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. दोघांना तैमूर अली खान आणि जेह ही दोन मुले आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

मात्र, काही दिवसांपुर्वी सैफबद्दल वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी तेव्हा जोर धरला होता. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकल्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आज सैफच्या वाढदिवशी याबाबत सोशल मीडियावर पुन्हा बोललं जातंय. नेटकऱ्यांनी हा(Saif Ali Khan) मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

काही दिवसांपुर्वी सैफ अली खानचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेत्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफच्या एका टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

सैफ अली खानचा आज वाढदिवस

सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

व्हायरल व्हिडिओवर एक नेटकरी म्हणाला होता की, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’ ,अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’ अशा प्रतिक्रिया तेव्हा उमटल्या होत्या. मात्र, या (Saif Ali Khan) सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या होत्या.

सैफ आणि करीना दोघेही सुखी आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दरम्यान, अनेक वर्षे डेट केल्यानंतर सैफ अली खान याच्यासोबत 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीनाने लग्न केले. सैफचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अमृता सिंहसोबत लग्न केले होते. सैफला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. अभिनेत्री सारा अली खान ही सैफ आणि अमृता यांची मोठी मुलगी आहे.

News Title :  Saif Ali Khan birthday today

महत्त्वाच्या बातम्या-

रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त 5G Smartphones, किंमत तुमच्या बजेटमध्येच

राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

मोठी गुड न्यूज! रक्षाबंधनापूर्वीच सोनं झालं स्वस्त; काय आहेत किमती?

आज ‘या’ 5 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा