बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतबद्दल आता प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर सैफ संतापला, म्हणाला…

मुंबई | सुशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड सृष्टीला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे सुशांतबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र या पोस्ट केवळ प्रसिद्धीसाठी केल्या जात असल्याचा आरोप अभिनेता सैफ अली खानने केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येपेक्षा दुदैवी बाब म्हणजे काही मंडळींनी या घटनेचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. सुशांत नैराश्येमध्ये असताना त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही, असं सैफ म्हणाला आहे. तो ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

तो गेल्यानंतर आता प्रत्येक जण त्याच्यासाठी प्रेम व्यक्त करताय. हे केवळ ढोंग आहे, बाकी काही नाही. ही मंडळी केवळ सुशांतचा अपमान करत आहेत, असंही सैफ अली खानने म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं कोरोनामुळे निधन

“यशराज फिल्म्स आणि सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, चौकशी करा”

“…तेव्हा हे कलाविश्व अत्यंत क्रूर आणि निर्दयी होत जातं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More