सैफ अली खानला रूग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Saif Ali Khan Discharged After Attack

Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर 16 जानेवारीला वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरात घुसून एका चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याला तातडीने वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांनी सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत (Police Custody) आहे. 20 जानेवारीला (सोमवारी) सैफला डिस्चार्ज मिळणार होता, पण ऐनवेळी त्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात आला होता. मात्र, आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सैफ थोडक्यात बचावला; शस्त्रक्रिया यशस्वी

सैफवर झालेल्या चाकू हल्ल्यादरम्यान त्याच्या पाठीत धारदार शस्त्राचा तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून तो तुकडा काढला. सैफ सुदैवाने या हल्ल्यातून बचावला कारण त्याच्या पाठीत ज्या ठिकाणी शस्त्राचा तुकडा अडकला होता तो त्याच्या मणक्यापासून फक्त 2 मिमी अंतरावर होता. सैफला पॅरालिसिसचा (Paralysis) धोका होता, पण डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्यावर योग्य ते उपचार केले. आता सैफ बरा होऊन घरी परतला असला तरी डॉक्टरांनी त्याला काही काळासाठी सक्तीच्या विश्रांतीचा (Bed Rest) सल्ला दिला आहे. (Saif Ali Khan)

आरोपीचा शोध आणि अटक

हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. सैफचा मोठा मुलगा इब्राहिम (Ibrahim) आणि तैमूर (Taimur) त्याला रिक्षातून रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर खान कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तब्बल तीन दिवस मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ठाण्यातील (Thane) कासारवडवली (Kasarvadavali) येथून आरोपीला अटक केली.

सैफवर सहा वार; आरोपीचा धक्कादायक खुलासा

सैफवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयातील सर्जन (Surgeon) डॉ. नितीन डांगे (Dr. Nitin Dange) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूचा अडीच इंचाचा तुकडा सैफच्या पाठीत खोलवर घुसला होता. तो शस्त्रक्रिया करून तातडीने काढावा लागला. चाकू खूपच खोलवर रुतल्याने मज्जातंतूच्या (Nerve) जवळपास इजा झाली होती. पाठीतील जे पाणी असते, ते लीक होत होते. तिथे आम्ही शस्त्रक्रिया केली. यामुळे सैफला पॅरालिसिसचा धोका होता. पण तातडीने उपचार केल्यामुळे तो टळला.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, सैफच्या घरात घुसण्याआधी आरोपीने वांद्र्यात राहणाऱ्या सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) सह अनेक सेलिब्रिटींच्या (Celebrity) घरांची रेकी (Recce) केली होती. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाकडून या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती आरोपीने मिळवली होती. त्यापैकी सैफचे घर चोरी करण्यासाठी आत घुसण्यास योग्य आणि अधिक सोयीचे वाटल्याने आरोपीने सैफ आणि करीना कपूर खानचे (Kareena Kapoor Khan) घर निवडले.

आरोपी सैफचा (Saif Ali Khan) मुलगा जहांगीरला (जेह) (Jehangir/Jeh) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. पण, हे करत असताना घरातील सगळेच जागे झाल्याने आरोपी घाबरला आणि तिथून पळ काढण्यासाठी बिथरलेल्या आरोपीने अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफवर एकूण सहा वार करून आरोपी फरार झाला. आरोपीला बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट (Fake Passport) हवा होता, त्यासाठीच पैशांची व्यवस्था आरोपी करत होता, अशीही माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे.

Title : Saif Ali Khan Discharged After Attack

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .