मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Saif Ali Khan Attacker Arrested

Saif Ali Khan Health Update | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्याच्या घरात एका अज्ञात चोराने घुसखोरी करत त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफ अली खानच्या मानेवर धारदार शस्त्राची 10 सेमीची जखम झाली आहे. तसेच, त्याच्या हातावर आणि पाठीवर देखील काही जखमा झाल्या आहेत. (Saif Ali Khan Health Update)

मिळालेल्या माहितीनुसार, चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेजवळ 10 सेमीची मोठी जखम झाल्याची माहिती आहे. याशिवाय त्याच्या हातावर आणि पाठीवर अनेक वार करण्यात आले. हल्लेखोराने सैफच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करुन पाठीत अडकलेलं हे धारदार शस्त्र काढण्यात आलं.

‘सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला.सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. आम्ही तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट देत राहू.’, असं निवेदन अभिनेत्याच्या टीमकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री चाकू हल्ला झाला. सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैफवर चोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत. तर, एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. (Saif Ali Khan Health Update)

या घटनेनंतर सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून या सर्व प्रकारामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.

महिला कर्मचाऱ्याचा आवाज आला अन् पुढे…

सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा ⁠रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफ अली खानला आला.आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला.

News Title : Saif Ali Khan Health Update

महत्वाच्या बातम्या-

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं

सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा

घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?

ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .