Saif Ali Khan Injured l बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारण अभिनेत्याच्या घरात एका अज्ञात चोराने घुसखोरी करत त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. मात्र आता त्याच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
सैफवर शस्त्रक्रिया सुरु :
यासंदर्भात लिलावती रुग्णालयाचे सीओओ यांनी माहिती दिली आहे. “सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून हल्ला केला. त्यानंतर सैफला मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या शरीरावर तब्बल सहा जखमा असून त्यापैकी दोन जखमा खोलवर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे”.
मात्र सैफला झालेल्या जखमांपैकी एक जखम सैफच्या मणक्याजवळ आहे. मात्र डॉक्टर सध्या त्याच्यावर सर्जरी करत आहेत. तसेच सैफच्या मानेवर असलेल्या जखमेवर सध्या उपचार केले जात आहेत. तसेच पहाटे 5.30 च्या सुमारास सैफवर शस्त्रक्रिया सुरू झाली असून ती अद्यापही सुरू आहे.
Saif Ali Khan Injured l सैफची प्रकृती स्थिर :
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या शरीरात चाकूचा तुकडा देखील आढळला आहे. त्यामुळे आता सैफची ही जखम किती खोलवर आहे, याची तपासणी सध्या सुरु आहे. याशिवाय सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफ अली खानला आला.आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.
News Title : Saif Ali Khan Health Updates
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….
सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर
मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं
सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत