Saif Ali Khan Net Worth | अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Net Worth) त्याच्या राहत्या घरी हल्ला (Attack) झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) उपचार सुरू आहेत. या घटनेने बॉलिवूड (Bollywood) आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरला होता. या घटनेनंतर सैफ अली खान प्रकाशझोतात आला असून, त्याच्याबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. सैफची ‘छोटे नवाब’ अशीही ओळख आहे. चला तर, जाणून घेऊया त्याच्या संपत्तीविषयी.
सैफ अली खानची एकूण संपत्ती
सैफ अली खानची एकूण संपत्ती १२०० कोटींच्या घरात असल्याचा अंदाज मीडिया रिपोर्ट्समधून (Media Reports) वर्तवण्यात येत आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी (Movie) जवळपास १०-१५ कोटी रुपये मानधन (Fees) घेतो. तसेच, ब्रँडच्या (Brand) जाहिरातींमधून तो जवळपास दीड कोटी रुपये कमावतो. (Saif Ali Khan Net Worth)
मुंबईतील आलिशान घरे
सैफचे वांद्रे (Bandra) परिसरात दोन आलिशान अपार्टमेंट (Apartment) आहेत. हल्लेखोर याच वांद्रे येथील चार मजली अपार्टमेंटमध्ये शिरला होता. या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर एक सुसज्ज हॉल आणि तीन बेडरूम (Bedroom) आहेत.
याशिवाय, वांद्रे येथेच सैफचे ‘फॉर्च्यून हाईट्स’ (Fortune Heights) नावाचे आणखी एक अपार्टमेंट आहे. लग्नानंतर (Marriage) करीना आणि सैफ याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. या घरात ११ वर्षे राहिल्यानंतर ते ‘सतगुरू शरण’ (Satguru Sharan) नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. ‘सतगुरू शरण’ अपार्टमेंटची किंमत अंदाजे १०३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते, तर ‘फॉर्च्यून हाईट्स’ची किंमत जवळपास ५० कोटी रुपये आहे. सध्या त्यांनी ‘फॉर्च्यून हाईट्स’ हे घर भाड्याने (Rent) दिले आहे. (Saif Ali Khan Net Worth)
Title : Saif Ali Khan Net Worth
महत्वाच्या बातम्या-
पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!
सावधान! शनिदेवाकडून ‘या’ राशींच्या कर्मांचा हिशोब, नशीब बदलणार
गँगचा लीडर कोण?, CID च्या तपासात खळबळजनक खुलासा
Elon Musk देणार नोकरी, डिग्रीचीही गरज नाही, इथे करा अर्ज
…तर संतोष देशमुख वाचले असते, CID च्या तपासातून धक्कादायक खुलासा