बेडमध्ये मी करिनासोबत… सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची सगळी कहाणी

Saif Ali Khan | बॉलिवूडमधील ‘छोटे नवाब’ सैफ अली खानवर 16 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेनंतर चोर सैफ अली खानच्या घरी कसा पोहोचला, त्या रात्री नेमके काय घडले, करीना कपूर घटनेच्या वेळी कुठे होती आणि सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये कोणी नेले, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांसोबत पोलिसांनाही पडले होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

लीलावतीमध्ये सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 5 दिवसांनी त्याला लीलावती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (23 जानेवारी) रात्री उशिरा सैफ अली खान याने घटनेच्या दिवशी नेमके काय घडले याबद्दल मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खानवर 16 जानेवारीला मुंबईतील (Mumbai) वांद्रे भागात ‘सदगुरू शरण’ इमारतीमधील त्याच्या 12 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आहे. त्यानंतर गेल्या आठ दिवसांत हल्ल्याच्या कटाचे अनेक पैलू आणि सत्य देशासमोर येत आहेत. आता पहिल्यांदाच सैफ अली खानने त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

मुलाच्या खोलीतून आरडाओरडा-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने (Saif Ali Khan) पोलिसांना सांगितले की, तो आणि त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान 11व्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये होते, तेव्हा त्यांना घरातील मदतनीस एलियामा फिलिपचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज त्यांचा लहान मुलगा जहांगीरच्या खोलीतून आला होता. त्यानंतर ते जेहच्या खोलीत पळत गेले, त्यांना तिथे एक अनोळखी व्यक्ती दिसली.

सैफने सांगितले की त्याने हल्लेखोरावर वार केला आणि त्याला पकडले. दरम्यान, हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर, आणि इतर ठिकाणी चाकूने अनेक वार केले. सैफने सांगितले की जेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकू मारला तेव्हा तो गंभीर जखमी झाला आणि कशी तरी स्वतःची त्याचा तावडीतून सुटका करून घेतली, नंतर हल्लेखोराला मागे ढकलले.

मदतनिस फिलिपकडून 1कोटीची मागणी-

यानंतर घरातील एक कर्मचारी जेहसह दुसरीकडे पळून गेला. या हल्ल्यात फिलिपही जखमी झाली होती. ५६ वर्षीय फिलिपने नंतर सैफला सांगितले की, अभिनेता येण्यापूर्वी त्या व्यक्तीने तिच्याकडे १ कोटीची मागणी केली होती.

रुग्णालयात दाखल-

दरम्यान एका कर्मचाऱ्याने जखमी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेले होते. त्यानंतर पतौडी कुटुंबीयांचा निकटवर्तीय आणि मित्र अफसर जैदी यांना पहाटे 3.30 वाजता सैफच्या घरातून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर साधारण 4 वाजता जैदी हा हॉस्पिटलला पोहोचला आणि त्याने सैफला रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली.

या घटनेनंतर सैफ अली खानला पहाटे लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या मानेला आणि हाताला झालेल्या दुखापतींसाठी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. तर 21 जानेवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

पोलिसांची माहिती आणि आरोपीचा शोध-

पोलिसांनी सांगितले की, “अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये घुसलेला व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घुसला होता. बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे या हल्लेखोराचे नाव असून त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.” दरम्यान, सैफ अली खानच्या वांद्रेच्या फ्लॅटमधून गोळा केलेले फिंगरप्रिंट शरीफुलच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत.

आरोपींनी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर चढण्यासाठी वापरलेल्या पाईपवर या खुणा आढळल्या. जेहच्या खोलीच्या दरवाजाच्या हँडलवर आणि बाथरूमच्या दारावर अतिरिक्त खुणा आढळून आल्या असून, ज्यामुळे आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी जोडले गेले आहे.

News Title : Saif Ali Khan recounts the night of the attack