बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली लेकीची अवस्था, म्हणाला…

मुंबई | अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री सारा अली खानला देखील धक्का बसला आहे. साराची सध्याची अवस्था तिचे वडील अभिनेता सैफ अली खान यांनी सांगितली आहे.

मी याविषयी बोललो तर साराला आवडेल की नाही हे माहित नाही, पण एक सांगावसं वाटतं. सारा प्रचंड दु:खी आहे. केवळ दु:खीच नाही, तर तिला फार मोठा धक्का बसला आहे, असं सैफने सांगितलं आहे. इतकंच नाही तर सध्या तिचं घरातलं वागणंही बदलल्याचं सैफने सांगितलंय.

साराला सुशांत एक अभिनेता म्हणून कायम आवडायचा. त्याच्या स्वभावातील काही गुण तिला आवडायचे. सुशांत प्रचंड बुद्धिमान असल्याचं तिने मला सांगितलं होतं. तो फिलॉसॉफी, इंजिनिअरिंग अशा विविध विषय़ांवर चर्चा करायचा. त्यामुळे अजूनही ती या धक्क्यातून सावरली नाही, असं सैफ म्हणाला आहे.

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूतसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सुशांतच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर सारा सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग बातम्या-

“…हे म्हणजे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”

“खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत”

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार-राजू शेट्टींच्या उपस्थितीत बारामतीत बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सध्याच्या घडीला मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही- नितीन गडकरी

सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून धोनीला जबर धक्का, पाहा त्याची पहिली प्रतिक्रिया…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More