Top News मनोरंजन

घराणेशाहीबाबत सैफ अली खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला….

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला. अशातच अभिनेता सैफ अली खानने मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो, असं वक्तव्य केलं आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही. करण जोहरबद्दल म्हणायचं झाल्यास, त्याने स्वत:ला इतकं मोठं बनवलं आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे, असं सैफने म्हटलं आहे.

भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचं पाहून मला आनंद होतो, असं सैफने म्हटलंय.

दरम्यान, सत्य हे नेहमी गुंतागुंतीचं असतं. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. मला आशा आहे की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील, असंही सैफने म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! महिनाभरात महाराष्ट्रात वाढले एक लाख कोरोनाबाधित रुग्ण

रितेश आणि जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय

नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांवर तुकाराम मुंढेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या