सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!

Saif Ali Khan

Saif Ali Khan l प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) (वय ५४) याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची खळबळजनक घटना घडली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी करत, धारदार शस्त्राने सैफवर सहा वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी (Seriously Injured) झाला असून, त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. सुदैवाने, डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची (Crime Branch) २० पथके तैनात करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील ‘सदगुरू शरण’ या इमारतीत सैफ अली खान पत्नी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) या दोन मुलांसह आणि मोलकरीण (Maid) यांच्यासोबत राहतो. मध्यरात्री दोनच्या सुमारास जेहच्या बेडरूममध्ये (Bedroom) एक चोर शिरला. दरम्यान, मध्यरात्री २:०० वाजताच्या सुमारास सैफच्या इमारतीमधील एका मजल्यावर अंतर्गत सजावटीचे काम सुरू असल्याने, तेथे काम करणारे ७ मजूर या चोराच्या ओळखीचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्या मदतीने चोर इमारतीत शिरला असावा आणि त्यांना भेटण्याच्या बहाण्याने तो शिड्यांवरून खाली उतरत, बाराव्या मजल्यावरील जेहच्या बेडरूममध्ये शिरला असा अंदाज आहे.

हल्ल्याचा थरार आणि शस्त्रक्रिया :

मध्यरात्री २:१५ च्या सुमारास, चोराला पाहताच मोलकरीण एनियामा फिलीप हिने आरडाओरडा केला. त्याचवेळी, २:३० च्या सुमारास जाग आलेल्या सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. झटापटी दरम्यान चोराने, “मला एक कोटी रुपये दे, नाहीतर जीव घेईन,” अशी धमकी देत, सैफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या झटापटीत मोलकरीण किरकोळ जखमी झाली. हल्लेखोराने सैफच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर आणि पाठीवर सहा वार केले.

गंभीर जखमी झालेल्या सैफला कुटुंबीयांनी रिक्षातून (Auto-rickshaw) लीलावती रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून सैफच्या मणक्यात फसलेला चाकूचा अडीच इंच तुकडा बाहेर काढला. सहापैकी दोन जखमा किरकोळ, दोन साधारण, तर दोन गंभीर स्वरूपाच्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Saif Ali Khan l चोरी की आणखी काही? :

दरम्यान, हल्ला केल्यानंतर चोर घाबरून पळून गेला आणि त्याने कोणतीही चोरी केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सैफवर हल्ला करण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत. हल्ल्यामागे चोरीचा (Theft) उद्देश होता की आणखी काही, याचा उलगडा तपासाअंतीच होईल.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “देशातील महानगरांत मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे. काही घटना घडत असतात, त्यांना गंभीरतेनेच घेतले पाहिजे. पण यामुळे मुंबई असुरक्षित आहे, असे चित्र उगाच निर्माण केल्याने मुंबईची प्रतिमा खराब होते. मुंबई अधिक सुरक्षित कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.”

News Title: Saif Ali Khan Stabbed in an Attack at his Bandra Residence

महत्वाच्या बातम्या-

NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!

एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल?, आढळराव पाटलांच्या आरोपांनी खळबळ

‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार आठवा वेतन आयोग, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अजित पवारांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का, पार्थ पवारांना स्थान मात्र मुंडेंना वगळले!

 

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .