तैमुरसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार; सैफने घेतला मोठा निर्णय

Saif Ali Khan | सेलिब्रिटींप्रमाणेच स्टार किड्सचा देखील मोठा चाहतावर्ग आहे. यात पहिलं नावं येतं ते करीना कपूरच्या मुलांचं. जेह आणि तैमूर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी पॅप्सही उत्सुक असतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की पॅप्स स्टार्स आणि त्यांच्या मुलांच्या मागे कसे धावतात.

सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने अलीकडेच भारतातील वाढत्या पापाराझी संस्कृतीबद्दल उघडपणे चिंता व्यक्त केली आहे, ज्याचा विश्वास आहे की सेलिब्रिटींच्या गोपनीयतेचं उल्लंघन होत आहे. अलीकडेच त्याने तैमूर आणि नंतर सैफ अली खानच्या मागे 50 लोकांच्या गटाने कारवाई केल्याची घटना नमूद केली.

वरिंदरने सांगितलं की, एक काळ असा होता, जेव्हा आम्ही तैमूरचे फोटो पोस्ट करत नव्हतो तेव्हा आमच्या पोस्टवर कमेंट्स येत असतात. आज तैमूरचा फोटो आला नाही. तैमूरचा क्यूटनेस लोकांना आवडला म्हणून पॅप्सने त्याच्या फोटोसाठी वेडेपणा करायला सुरुवात केली.

Saif Ali Khan | सैफने पापाराझींना केली विनंती

यूट्यूबर ईशानला दिलेल्या मुलाखतीत वरिंदरने तैमूरसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला, ज्यानंतर करीना आणि सैफ दोघेही घाबरले होते. यानंतर सैफने मोठं पाऊल उचललं.

‘तैमुरचा 50 जणांनी पाठलाग केला…’

या मुलाखतीत वरिंदर चावला यांनी स्वत: कबुली दिली की तैमुरच्या बाबतीत एका घटनेत सर्व पापाराझींनी खूपच अती केलं होतं. एकदा मी माझ्या टीम मेंबरच्या बाईकवर मागे बसलो होतो. तैमुर ट्युशनला जात होता आणि तेव्हा मी पाहिलं की जवळपास 40 ते 50 लोक त्याचा बाईकवरून पाठलाग करत होते. मी हादरलोच ही 50 लोकं कुठून आली, असा मला प्रश्न पडला. त्यात एकाने म्हटलं की, पुढे तमाशा बघ. त्यापैकी एक जण गेटवर चढला, इतरांनी त्याच्या कारला घेरलं. जणू सर्वजण मिळून त्याच्यावर हल्लाच करणार की काय, असं वाटत होतं. मी स्वत: खूप घाबरलो होतो आणि तेव्हा वाटलं की, नाही यार.. हे खूप चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

सैफने (Saif Ali Khan) आम्हाला फोन केला आणि शाळेत जाताना तैमुरचा पाठलाग करू नका अशी विनंती केली. तेव्हा आम्ही त्याचा पाठलाग करण्यास सोडून दिलं, असं वरिंदरने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जाणांना विषबाधा

श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?

शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रान पेटवणार; लक्ष्मण हाके निर्णय घेणार?

सोनाक्षी-झहीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू! ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात