शाहरुखने करीयर मुलींच्या मागे जाऊन घडवलं; सैफचं शाहरुखबद्दल स्पष्ट वक्तव्य

मुंबई | शाहरुख खानने मुलींचा पाठलाग करुन आपली सिनेमातील कारकीर्द घडवली, असं वक्तव्य  अभिनेता सैफ अली खानने केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफ बोलत होता.  सैफच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हिंदी चित्रपटात अभिनेत्रीची ओळख काढण्यासाठी पाठलाग करणं, त्यानंतर लगेचं प्रेमात पडणं या सगळ्या कल्पनांचे ‘रोमँटिसिझम’ करून दाखवलं जातं. शाहरूखने हाच फॉर्म्युला वापरून आपले चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट केले, असे देखील त्याने मुलाखतीत म्हटलंय.

‘आपल्या भारतीय समाजात महिलांचा पाठलाग करण्याची पद्धत नाही. त्यामुळे सिनेमात दाखवलेल्या या कल्पना मूळ भारतीय नाहीत…याचा अर्थ हे पाश्चात्य देशातून आलंय. आपल्याकडे बॉलिवूडमध्ये हॉलिवूडच्या अनेक कल्पना वापरल्या जातात, असं सैफचं म्हणणं आहे.

‘बाजीगर’चं उदाहरण देताना सैफ म्हणाला की, ‘बाजीगर’ ही मूळ कथा भारतीय नाही. एका हॉलिवूडपटाची ही कथा आहे. जी आपण भारतात पुन्हा निर्माण केली.

महत्वाच्या बातम्या-